Monday, January 9, 2017

सह्याद्रिच्या कुशीतील एकाखाली एक पडणा-या 7 अनोख्या धबधब्यांच्या श्रृंखलांचा शोध...


      माझ्या आयुष्यातील प्रथमच नववर्षाची इतकी सुंदर सुरवात आमचे जिद्दीचे लिडर श्री. धिरज पाटकर आणी जिद्दीचा मुख्य आधारस्तंभ श्री.अरविंद नवले आणी आमचे जिद्दीचे इतर मेंबर जुई, तिलोत्तमा, भुजंग, आणी आमचा सर्पमित्र...विनायक......... आणी अगदि 31 व 1 तारखेलाच जायच असे निक्षून ठरवणारे व ज्यांच्यामुळे आज प्रथमच रेकी करताना जिवनातील परमोच्च आनंद घेता आला असे माझे मित्र श्री. राजेंद्र दळवी ..... या सर्वांच्या मुळेच एका वेगळ्या पध्दतीने आपण ज्याला 31 डिसेंबर साजरा करणे म्हणतो तो आम्ही जिद्दीसाठी रेकी करून साजरा केला.
     
 
          प्रथम श्री.दळवी गेली 15 दिवस माझ्या पाठी लागले होते की, हर्दखळे येथे ट्रेकींगला खुप चांगले डोंगर आणी धबधबे आहेत... आपण जाऊया..... मी थोड दुर्लक्ष करत होतो... कारण माझी नोकरी आणी शिल्लक रजा यांच गणित ट्रेकींगच्या वेडापायी जरा विस्कळीत झाल होत..... ही गोष्ट मी जिद्दीचे लिडर श्री.धिरज आणी श्री. अरविंद नवले यांना सांगितली.... आता धिरज, अरविंदला अशी गोष्ट समजल्यावर ते थोडकेच गप्प बसणार... मग कोणत्याही परिस्थितीत हा रेकी ट्रेक करायचा त्यांनी चंगच बांधला... यावर गेली 15 दिवस दररोजच बोलण........ शेवटी रेकीला जायच ठरल.  रेकीला प्रथम मी श्री.दळवी, धिरज आणी अरविंद एवढ्यांनीच जायच फिक्स झाल.  परंतु जशी ही गोष्ट आमच्या ग्रुप मध्ये हळुहळु पसरली तसे एक-एक मेंबर रेकी साठी वाढायला लागले. रेकी असल्याने तीथे रहाण्याची-जेवणाची व्यवस्था अचानक कीती जणांची होईल की नाही............इत्यादी गोष्टी असल्यानेच आम्ही प्रथम 4 जणांनीच जायच ठरवल होत.  परंतु हर्दखळे गाव श्री.दळवींचे आईचे आजोळ असल्याने, त्यांनी तेथील स्थानीक लोकांना रोजगार मिळावा म्हणून  तेथील एका व्यक्तीला फोन वरूनच व्यवस्था करायला विचारणा केली..... आता शहरातुन येणा-या शहरी लोकांची आपणाला बडदास्त ठेवता येणार नाही म्हणून त्यांनी त्याला नकार दिला... शेवटी दळवींना त्याला पटवून द्याव लागल की आमची कोणतीही बडदास्त नसते.......... आम्ही उघड्यावर झोपलो............ पिठल भात खातो........... ते सुध्दा नसल्यास भाकरी आणी तेल मीठ सुध्दा खातो.... यालाच म्हणतात जीवन... आणी जिद्दीचा पण हाच उद्देश आहे की येईल त्या वेळेत व वेळेनुसार माणसाला जगण्याची कला आत्मसाद करता आली पाहीजे तोच या जीवनात टिकू शकतो व त्यामुळेच या माध्यमातुन आम्ही तरूण पिढी देखील घडवत असतो.  वेळ प्रसंगी 2 दिवस उपाशी रहाता आले पाहीजे..... या सर्व गोष्टी श्री. दळवींना सातत्याने 8 दिवस त्या गावातील व्यक्तीला सांगत रहावे लागले.   त्या नंतर त्याने आमच्या व्यवस्थेस होकार दिला.... तरी तो आम्ही जाईपर्यंत साशंक होताच.....
      असे एक एक करत रेकीसाठी मेंबर वाढू लागले........... मी दळवींना सतत म्हणत असे की रेकीला एवढे मेंबर नको नेऊया........... परंतु श्री.दळवींचा या तरूणांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन......... आपणाला भावी पिढी घडवायची आहे.......... त्यांची उर्जा नकोत्या ठिकाणी वाया घालावण्यापेक्षा या चांगल्या ठिकाणी जाउदे. लोक 31 डिसेंबरला नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली पार्ट्या करतात आपण या मुलांच्या साथीन नववर्षाचे स्वागत एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने करूया.  शेवटी त्यांची भुमीका मला देखील पटल्याने बरोबर येतील तेवढ्या जणांना घेउन रेकी करायच धिरज आणी अरविंदने ठरवले...... मेंबर वाढले आणी काही कारणांनी कमी होउन शेवटी 10 मेंबर फायनल झाले परंतु निघताना अचानक अनुज देवस्थळी आणी त्याचा पार्टनर यांना आचानक त्यांच्या वर्कलोड मुळे त्यांने येणे रद्द करावे लागले.
      5 दिवस आदी यातील मी आणी श्री.दळवी वगळुन बाकीचे दुपारी निघायच ठरल होत.  व मी, श्री.दळवी सायंकाळी 6 नंतर निघणार होतो.  परंतु आदी 2 दिवस रत्नदुर्ग किल्ला ते ब्रेक वॉटर वॉल येथे असलेली केव्ह ( गुहा ) जिद्दी माउंटेनिअरिंगच्या माध्यमातुन पुनर्जिवीत करण्या संदर्भात मान.नगराध्यक्ष नगर परिषद रत्नागिरी यांची मी आणी श्री.धिरज मिळुन भेट घेतली होती आणी त्या भेटीत लगेचच मान. नगराध्यक्षांनी दुस-या दिवशी म्हणजेच दि. 30 किंवा 31 ला मान. जिल्हाधिकारी यांचेशी आपण या विषयावर भेट घ्यायची आहे असे सांगितल्याने श्री.धिरज ला दुपारी निघण्याचा निर्णय बदलावा लागला आणी आम्ही दुपारी मान.नगराध्यक्षांचे समवेत मान.जिल्हाधिकारी यांची भेट घेउन संध्याकाळी रेकी ट्रेकला 6 वाजता निघालो.  निघताना स्टेडियमला जमायचे ठरल्याने आम्ही 6 वाजता सर्व एकत्र जमलो. अनुज रद्द झाल्याने तो येणार नव्हता.  अचानक अरविंदची गाडी पंक्चर झाली.  त्याने ती ढकलत गांधी पंपावर पंक्चर काढण्यासाठी नेली असता तीचा टायरच बदलणे आवश्यक असल्याने त्याने ती गाडी तिथेच ठेवुन नंतर अनुजची गाडी आणुन रात्री 7.30 ला आमचे प्रयाण हर्दखळे गावाकडे झाले............चार गाड्या आणी 8 मेंबर असे निघालो.......... जाताना गाडीवरून पाली पर्यंत थंडी जाणवत नव्हती... परंतु पाली पासुन थंडी असल्याने सर्वांनी थंडीची आयुध बाहेर काढली..... साधारण: रात्रौ 8.30 ला श्री.दळवी यांचे आजोळी गोवीळ गावी पोहोचलो...........
 
त्यांच्या घरच्यांच्या गाठीभेटी.....त्यांनी केलेली आपुलकीने चौकशी........... त्यांचा तो आपुलकीचा आग्रह............मन भाराहून गेल..... आजकाल अशी आपुलकी फक्त ग्रामिण भागातच राहीली आहे याच दर्शन झाल...... तीथुन श्री. दळवींचे मामेभाऊ यांनी आमच्या बेस कॅम्प पर्यंत हर्दखळे गावात येण्याच ठरवल...........या गावात सुध्दा श्री.दळवींचे नातेवाईक.......... प्रवास गोवीळ ते हर्दखळे 12 की.  ............ रस्ता ग्रामीण असल्याने पुर्ण खराब........शासनाची कृपा....... गावात दळवींच्या नातेवाईकांचा जेवणाचा प्रचंड आग्रह....... पुन्हा आपुलकीच दर्शन..... गाड्या लावून आम्ही पायी चालत जंगलातुन आमच्या बेस कॅम्प घराकडे निघालो.  काळोखातुन 10 मिनिटे पायी चालल्यावर आम्ही आमच्या बेस कॅम्प जवळ पोहोचलो.  मग जेवणाची तयारी...... फक्त भात.... वर डाळीची आमची आणी वांग बटाट्याची भाजी....... इथे मात्र एक सांगावस वाटत, गावठी वांग्याची चव काही न्यारीच असते...........बर आत्ता पर्यंत प्रत्येक ग्रामिण भागानुसार तीच्या भाजीची चव निराळी आणी ती सुध्दा अप्रतीम.... जेवण झाल्यावर आम्ही झोपू............छे झोपणार ते जिद्दीचे मेंबर कसले.......... प्रचंड थंडी.... धिरजने टेंट आणला होता... तो घराच्या अंगणातच लावला..... आत फोटो सेशन....... कसेतरी सारख सांगुन सांगुन रात्री 12 ते 12.30 चे दरम्यान सर्व झोपले....
      नेहमी प्रमाणे 5 वा अरविंदचे कॉलिंग सुरू उठा उठा...... 5 वाजले...... श्री.दळवींनी घरमालकाला उठवले ..... त्याने भाक-या भाजायला घेतल्या ....... मग पिठल....... गवती चहापातीचा गरम गरम चहा.....आणी नाष्ट्याला फोडणीचा भात........
घरमालकाची पत्नी मुंबईत कामाला असल्याने घरात दोन मुली व दोन मुल असा परिवार..... यामुळे घरमालकांनाच सर्व व्यवस्था एकट्यानेच करावी लागल्याने आम्हाला निघण्यासाठी जरा उशीरच झाला.  आम्ही सकाळी 7.45 ला सह्याद्रिच्या कुशीत शिरायला निघालो. 
सकाळची बोचरी थंडी..... घनदाट जंगल आता त्या ठिकाणी म्हणाव तेवढ नाही कारण संपुर्ण सह्याद्री जवळजवळ 2500 एकर आणी त्याच्या टोकापर्यंत काही धनधांगड्यांनी विकत घेउन रब्बर लागवडीच्या नावाखाली उजाड करून टाकलाय. अनेक वर्षांची जैवीक संपदा यांनी कायमची नष्ट करून टाकली........... एक घनदाट जंगल बनायला, अनेक मोठे वृक्ष वाढायला 300-400 वर्षांचा कालावधी लागतो.  निसर्ग बनवता येत नाही.  जंगल बनवता येत नाही.  हे या मुर्खांना कोण सांगणार.  अनेक अमानवी अत्याचारच त्या सह्याद्रीवर त्याच्या पाया पासुन ते त्य़ाच्या डोक्यापर्यंत रस्ते करून केले............ या बाबत मला विस्तृत लिहायच आहेच ते इथे नको आपला वाचनातला मूड मी इथे का खराब करू.....?


      असो असे आम्ही या सह्याद्रीतुन दल-मजल करत 1 ते दिड तासाने पहिल्या धबधब्याजवळ पोहोचलो... आजच्या ट्रेकचा उद्देश फक्त रेकी हाच असल्याने सह्याद्रिची रेकी....बस.... धबधबा मोठा..... जानेवारीत एवढ पाणी ..... वा...खुप छान.....मला प्रश्न पडला..... परंतु याला उत्तरही आहे ते माझ्या शेवटच्या टप्यात देईन.....
      पाणी आणी फोटोग्राफी माझा विक पॉइंट...... प्रत्येकाला धबधब्याजवळ उभे करून फोटोसेशन....... नंतर या धबधब्या जवळुनच उंचच्या उंच कडे सुरवात होतात..........झाल आता खर कसब पणाला लागणार होत.... बर आम्ही काय ऐकणार थोडेच..... आम्ही शिवबाचे मावळे.....श्री.दळवी तर पुर्ण ट्रेक मध्ये माझ्याशी गप्पा मारताना म्हणायचे की, इतिहास काळात कसे लडले असतील हे ? .....
      आम्ही पुर्ण तयारीनिशी आलो होतो.  आम्हाला माहित होते आपण सह्याद्रीला गवसणी घालणार आहोत...... आजच्या तरूणांच्या भाषेत सांगायच तर यु.पि.एस.सी ची परिक्षाच जणू ती..........
      येताना गिर्यारोहणाचे सर्व सामान..... Rope , Tubelor Rope ,Seat harness, Decender, Pully, Mitons पासुन ते टेंट पर्यंत सर्व घेउन आलो होतो..... मग चढाईची तयारी.  गेली अनेक दिवस आम्ही लिंगाणा मोहिमेची तयारी भाट्ये बिच येथील कड्यांमध्ये करत असल्याने बराच सराव आदीच झाला होता.  त्याची टेस्ट एक्झामच जणू होती....
      धरायला मनगटा एवढ्या जाड वेली ...... अहो अशा जाड वेली मी ब-याच वर्षाने पहात होतो........मग काय वेलींबरोबर आणी आमच्या गिर्यारोहण साधनां सोबत आमची चढाई सुरू... सुरवातीच्या काळात असे कीती धबधबे असतील अशी सारखी आमची चर्चा..... आमच्या अनुभवाप्रमाणे...... म्हणजेच जिद्दीच्या.... .....उंच ठिकाणी सह्याद्रीच्या रांगामध्ये नक्कीच एका खाली एक धबधबे असु शकतात...... पहिला तर पाहून झाला होता..... आता दुस-याकडे वाटचाल सुरू होती....85 अंशांमध्ये जाड वेलिंच्या आधारे प्रथम आम्ही एक मोठी चढाई पार करून वर आलो.  दुस-या धबधब्या कडे डायरेक्ट जाता येत नव्हते म्हणून आम्ही पुढे आल्यावर आम्हाला 100 फुटांचा तिसरा धबधबा दिसला मग त्याच्याकडे जाण्याची तयारी....
सह्याद्रिच तो, तो त्याचे अस्तित्व दाखवत होता..... उंच सरळ सोंड कातळ दगडांवर वाढलेले आणी सुकलेले गवत आम्हाला फसवत होते.  त्यातुन वाट काढत आम्ही अवघड ठिकाणांहून जात होतो..... आता 3 रा धबधबा पुर्ण दृष्टीक्षेपात आला होता परंतु त्याच्या सर्व बाजुंनी उंच उंच कडे...... कस उतरायच विचार करून करून एका ठिकाणी 80 ते 85 अंश कोनातुन 150 फुट खाली उतरता येईल अशी जागा दिसली.  मातीचा उतार.... त्यावर कार्वीची छोटी झाड....... या ठिकाणी एका झाडाला अरविंदने ट्युबवेल रोपने अॅंकर केला........ आणी स्वता सिटहार्नेस बांधुन प्रथम तो गिर्यारोहणाच्या अत्याधुनिक साधनांचा वापर करत.... रॅपलिंग करत खाली गेला....... वरून खाली काही ही दिसत नव्हते किंवा मोठ्याने ओरडून एकमेकांशी संवाद साधता येत नव्हता. आम्ही नेहमी बरोबर वॉकी - टॉकी घेत असतो परंतु या वेळी त्यातील सेल चार्ज नसल्याने ती घेतलेली नव्हती....परंतु त्याने मोठी पंचायत होणार नव्हती कारण आमच्या गिर्यारोहणाची अशावेळी एक सांकेतिक भाषा आहे......जेव्हा आपला एखादा गिर्यारोहक आपल्या दृष्टीक्षेपात नसतो किंवा आपण त्याच्याशी बोलु शकत नसतो त्यावेळी एओ.......अशी मोठ्याने म्हणजे मराठी भाषेत बेंबीच्या देठापासुन हाक मारायची असते.... हा शब्ध जर त्याने ऐकला तर तो त्याला प्रतिसाद म्हणून ओए............ असा प्रतिसाद देतो.... य़ामुळे तो आपल्या जवळपास कुठे आहे हे समजुन येते....आता एओ आणी ओए हेच शब्ध का असा प्रश्न पुर्वी आम्हाला पडला होता त्या वेळी श्री.धिरजनी सांगितले, संपुर्ण जगात गिर्यारोहणात हेच शब्द वापरले जातात कारण हे शब्ध आपण इतर कोणत्याही शब्दांपेक्षा जास्त ताकतीने व मोठ्याने उच्चारू शकतो.  त्यामुळे त्याचा आवाज मोठा व दुरवर पसरतो..... याच्या उपयोगाने आम्ही अरविंदशी संपर्क करत होतो..... अरविंद खाली पोहोचल्यावर खालील परिस्थिती उतरण्यायोग्य आहे याची त्याने खात्री केली आणी प्रत्येकाने एक-एक करून खाली येण्याचे संकेत दिले....... मला केव्हा एकदा खाली जातो याची उत्कंठता होती.... मी जाऊ की तु जातोस असे करत बसायला मला वेळच नव्हता... गिर्यारोहण साधनांच्या सहाय्याने, दोरीच्या सहाय्याने उतरताना देखील आपल्या ताकदीचा व इच्छाशक्तीचा कस लागत होता....... एक एक करून आम्ही खाली आलो..... आमच्या बरोबर ज्या घरात आम्ही उतरलो होतो त्याचे घरमालक श्री. बमाजी जनार्दन गोरे व त्यांचा एक मुलगा हर्ष हा पाचवी इयत्तेत शिकत आहे व त्याच्या पेक्षा एक लहान 1 ली मध्ये शिकणारा अशे आमच्या बरोबर वाट दाखवायला पहिल्या धबधब्या पर्यंत आले होते.  परंतु पहिला धबधबा पाहिल्यावर व आमच्यातील उमेद बघुन त्यांना सतत आमच्या सर्वांची सुरक्षेची काळजी वाटत होती ती त्यांच्या डोळ्यात व चेह-यावर दिसत होती. आम्ही जेव्हा पुढे निघालो तेव्हा ते देखील आमच्या सोबत वर यायला निघाले. त्यांना नको नको म्हणत असताना देखील ते आलेच. 
     
या तिस-या धबधब्याकडे आमची सर्व टिम सुरक्षीततेच्या साधनांच्या सहाय्याने उतरली.... त्याच वेळी त्या बमाजी गोरेंच्या मुलांना देखील सुरक्षीततेची साधने बांधुन उतरावयाचा निर्णय झाला कारण ती मुल खुप हट्ट करत होती आणी त्यांच्या वडिलांची जिद्द..... या वेळी मी वर नमुद केल्या प्रमाणे जेव्हा आम्ही पहिला धबधबा सोडून निघालो तेव्हा मला ग्रामिण भागातील बापाचे दर्शन झाले... मी हा प्रसंग मुद्दाम आपल्याला शेअर करत आहे.
      पहिल्या धबधब्याकडून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा दोन मोठ्या दगडांमधुन वहाणा-या पाण्याला ओलांडायचे होते.  सर्व उड्या मारून पार करून गेले तस या श्री. बमाजी गोरेंची मुले सुध्दा निघाली...... मोठा मुलगा उडी मारून पार
करून गेला.... लहान मुलगा सुध्दा ते दोन दगड पार करून जाऊ शकला असता परंतु त्या बमाजी गोरेंच्यातील, ज्याला आपण कोण बाबा म्हणतो.... तर कोण बाप....पप्पा.....डॅड...नावाने हाक मारतो..... ग्रामीण भागातील अशिक्षीत त्या बमाजी गोरे यांच्यातील बाप जागा झाला..... त्याच्यातील मुलाचे प्रेम जागे झाले.... आपला मुलगा  उडी मारताना चुकला तर खाली पाण्यात पडेल आणी त्या गार पाण्याचा त्याला त्रास होईल... त्याला लागेल याची जाणीव त्या अशिक्षित बापाला झाली आणी त्याने हट्टाने त्या मुलाला आपल्या पाठीवर घेतले आणी स्वत: ते दोन्ही दगड पार करून दिले.... मला तो क्षण कॅमेरॅत टिपता आला.... आणी याच मुलाला जेव्हा आम्ही 100 फुट पुर्ण सुरक्षीततेची साधन बांधुन खाली उतरवत असताना तो त्या मुलाबरोबर जाण्याचा लहान मुलासारखा हट्ट करत होता..... कारण त्याला आपल्या मुलाची काळजी होती...... काय वर्णन करू त्या बापाचे..... मुलाबद्दल असलेले प्रेम..... मित्रांनो आपण आई या विषयावर अनेक कविता व्याख्याने ऐकतो... परंतु बापावर कोणी कविता करत नाही.... कोणी लिहीत नाही...... कारण बाप...बाबा...तो बाबाच असतो.... त्याला त्याच्या मुलाच्या आनंदात आपला आनंद दिसत असतो.....मुल आपल्या पेक्षा मोठी होण्यात आणी मुलांनी आपणाला हरवण्यात बापाला आनंत मिळतो....... आजही ते दोन्ही प्रसंग आठवले की माझे डोळे पाणवतात... शेवटी बाबा ग्रामिण भागालीत असो वा शहरातील...... बाबा.... तो बाबाच असतो..... जगात दोन पुरूषांमध्ये एवढ एकच, असूया,मत्सर व द्वेष नसणार.....निर्भेळ,स्पष्ट नात असाव.  आपल्यापेक्षा दुसरा पुरूष मोठा व्हाव,यशस्वी व्हावा,नावारूपास यावा, असा आशिर्वाद फक्त बापच मुलाला ह्रदयासून देत असतो...... हा प्रसंग सर्वांच्या बाबांना समर्पित.......
     
असो..... आम्ही त्या मुलांना देखील खाली उतरवुन या तिस-या धबधब्या जवळ गेले..... अहो वेड लागल सगळ्यांना 100 फुटांवरून फेसाळत पडणारा तो....दुधाळ ......धबधबा..... आम्हाला त्याच्या जलधारा अंगावर घ्यायच्या होत्या परंतु वेळ कमी होता...पुढचा टप्पा गाठायचा होता.... सकाळचे 11.30 वाजले होते...सर्वांना या ठिकाणी मनसोक्त पाणी पिउन घेतले..... त्याच्या सोबत फोटोसेशन झाले... आणी आम्ही आलेल्य़ाच मार्गाने परत निघालो.... पहिल्या धबधबा आणी तीसरा यामध्ये दुसरा पहायचा राहून गेला कारण त्या ठिकाणी जाण्याची वाट सापडत नव्हती आणी ती अत्यंत कठीण देखील होती.... पंरंतु आम्ही जेव्हा तिस-या धबधब्या ठिकाणी आलो तेव्हा... त्याच्या समोरूनच पाण्यातुन त्या
ठिकाणी जाण्याची सोय असल्याचे दिसले ..... अरविंदने पुर्ण रेकी केली.  परंतु पाण्यातुन सगळ्यांना नेणे म्हणजे वेळ जाणार होता...आणी कपडे भिजल्याने होणा-या त्रासाचा विचार करता हा धबधबा नंतर पहावा असे ठरवले... परतीच्या मार्गात प्रत्येकाला क्लायंबिंग करावे लागले.... वर चढताना प्रचंड धुरळा उडत होता.... छोटे असंख्य दगड पडत होते त्यामुळे एक जण पोहोचल्या शिवाय दुस-याने चढणे जरा रिस्की होते..... सर्व
सुरक्षीत वर आल्यावर आमच्या सोबत गावातुन आलेले श्री.बमाजी गोरे आणी त्यांच्या मुलांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला कारण पुढील वाट आणखी खडतर होत चालली होती..... त्यांना आम्ही सुरक्षीत उतरवुन परत पुढला टप्पा पार करायला सुरवात केली. जुई गांधी....आणी तिलोत्तमा यांची पुरती दमछाक झाली होती..... परंतु आम्ही सर्वांनी क्लायंबिंगचे बेसीक धडे घेतलेले असल्याने काही अवघड वाटले नाही......याचा उपयोग आम्हाला लिंगाणा सर करताना नक्कीच होणार आहे....

     
चौथ्या धबधब्याकडे आमची खडतर वाटचाल सुरू झाली.......70 ते 80 अंशातील चाढाई रोपच्या सहाय्याने आम्ही करत होतो....... एका पाठी एक....एकमेकाला प्रोत्साहन देत.....एक मेकांना आधार देत...... याच वेळी प्रत्येकाची एकमेकां बद्दलची..... आपुलकी, आदर......काळजी लक्षात येते...... मला स्वताला दोन मुलगे..... मुलगी नसल्याची खंत....... त्यामुळे आमच्या ग्रुप मध्ये माझ्या मुलांच्या वयाच्या मुली असल्याने मला सतत त्यांच्यात माझी मुलगी दिसते.... त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे आलच.... त्यामुळे जुई आणी तिलोत्तमा यांची सारखी काळजी मला लागुन राहीलेली..... तशा त्या रफ टफ आहेतच...... परंतु मध्येच त्यांच्या चेह-यावरील दमछाक एका वडिलांच्या
दृष्टीकोनातुन मला सारखी दिसत होती.... त्याना मोटीवेट करण्याच काम मी आणी श्री.दळवी अधुन मधुन करत होतो..... चौथा धबधबा काही केल्या आम्हाला दिसत नव्हता.......जेव्हा आम्ही खुर वर चढुन गेलो तेव्हा तोंडात बोट घालायची वेळ आली..... 120 फुट उंच पडणारा तो...........सौदर्याने भरलेला तो..........सागराच्या ओढीने झेपावणारा तो........आपल्या पांढ-या शुभ्र सौदर्याने गिर्यारोहकांना कायम भुरळ घालील असा तो.....
उठती वरती जलदांवरती
अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय
रोखिले सुंदरतेचे रूप महा

कवी कुसुमाग्रज यांच्या या काव्यपंक्तीतच जलधारांच्या सौदर्याचे वर्णन केले आहे. अगदी तसेच वर्णन या धबधब्याचे करावेसे वाटते. या धबधब्याने मन मोहून निघते...... याच्या जवळ जाण्यासाठी आमच्या सर्वांच्या मनात आनंदाच्या जणु उखळ्या फुटत होत्या..... डोंगराच्या एका बाजूने कसे बसे आम्ही त्याच्या जवळ गेलो.  जाताना ठीकाण अस होत की, जरा जरी घसरलात तर परत उठणे शक्यच नाही.... या ठीकाणी आम्ही प्रत्येकाला आधार देण्यासाठी विनायकला उभे केले होते.... याच ठिकाणी धिरज मातीवरून सरकला..... त्याका काही केल्या उठता येत नव्हते..... पाठिवर
गिर्यारोहणाच्या आयुधांची 30 ते 40 किलो वजनाची सॅक..... मदतीला विनायक धावला ..... त्याच्या आधाराने सुध्दा त्याला उठता येत नव्हते......कसा उठणार तो....... पायाखाली सरकती माती.......आजु बाजुला कोणताच आधार नाही...... हा आधार होता परंतु तो धरू शकत नव्हता..... कारण ते काटेरी निवडुंगाचे झाड..... शेवटी सरकत सरकत पुढे पुढे येउन तो विनायक च्या आधाराने कसातरी उठला..... या प्रसंगाचे फोटो आणी चित्रीकरण मि मुद्दाम केले.... कारण यातुनच आपण धडा घ्यायचा आहे..........की निसर्गाच्या पुढे तुम्ही कितीही प्रशिक्षीत असाल तरी तुमची किंमत शुन्य ठरते........ त्यामुळे कधीही तुम्ही निसर्गाला आवाहन म्हणुन कोठे जाऊ नका तर त्याला शरण जा..... तो तुम्हाला पार नेईल जस त्याने आम्हा सर्वांना नेल...
      सर्वजण त्या धबधब्याच्या दिशेने आदि पळाले.... सुंदर रूप............मन प्रफुल्लीत झाल.............थकवा पार निघुन गेला.......... आणी पुढच्या वाटचालीसाठी त्याच्या कडून उर्जा मिळाली...
      मग फोटो सेशन....आणी पुढे मार्गस्त.......
इथुन आणखी खडतर प्रवास सुरू झाला........... या धबधब्याच्या वर धबधबा आहे की नाही याची शंका........... असला तर त्याच्या जवळ जाता येईल की नाही......कोठुन जायच इत्यादी अनेकप्रश्न पुढे दत्त म्हणुन उभे...... चौथ्या धबधब्याच्या डाव्या बाजुने आम्ही वरच्या दिशेने वाटचाल करायचे ठरवले.......... अरविंद पुढे गेला......... चढण 80 अंशात सरळ सोट....... अरविंदने पुन्हा एकट्याने 70 ते 100 फुट ऊंच जाऊन एका मजबुत झाडाला अॅंकर केला आणी रोप खाली पाठवला........... प्रत्येक जण आधुनिक साधनांच्या मदतीने क्लायंबिंग करत वर गेले.......... खुप अनुभवी आणी त्रासदायक वाट.......... अॅंकर केलेल्या झाडा पासुन पुन्हा वरच्या दिशेने 100 फुट उभीचढण चडून गेल्यावर उजव्या बाजूला 50 ते 75 फुट खोलीवर वहाणारे फक्त पाणी......... धबधबा कोठेच दिसत नव्हता..... परंतु तो असणार याची प्रत्येकाला खात्री...... त्याच्या ओढीने प्रत्येकजण वाटचाल करत होता..... पुन्हा एका झाडाला
 अरविंदने ट्युबरोपने अॅंकर करून एक एक 85 अंश कोनात रॅपलिंग करत खाली उतरत होता.... सर्वजण खाली उतरले.... प्रत्येकाला प्रचंड भुक लागली होती त्यामुळे आदी पोटपुजा करण्याचा सगळ्यांचा मानस दिसुन आला..... मी आणी श्री.दळवी मात्र त्या धबधब्याच्या ओढीने पुढे निघालो..... अनेक अजस्त्र उंच उंच दगड........एक एक दगड 10 ते 15 फुट उंचीचा...... ते पार करत करत आम्ही एका नागमोडी वळनाने जेव्हा पुढे गेलो तेव्हा त्या 120 ते 150 फुटावरून जवळ जवळ एकाला एक अश्या चिकटलेल्या 


दोन डोंगरांमधुन पडणा-या अजस्त्र धबधब्याचे दर्शन झाले.... परंतु तो जिथे पडत होता त्या ठिकाणचे दर्शन मात्र होत नव्हते.......... उत्कंठता खुप दाटली होती..... दळवी म्हणत होते आदि सगळे येउंदेत........... परंतु मी मात्र थांबायला तयार नव्हतो..... मग काय जेव्हा त्याच्या पायथ्याशी गेलो ते दृष्य आत्तापर्यंतच्या सर्व धबधब्यांपेक्षा अतिशय विलोभनिय.........सुंदर........... होते.... धबधब्याच्या एका बाजूला पार
चिकटून काळाभोर उंच कातळाचा कडा....

 तर दुस-या बाजूला चिकटून उंच डोंगर ....दोन्हींच्या मध्ये जेम तेम 10 फुटाची रूंदी..... खाली 50 फुटांची पाणी पडल्याने तयार झालेले लांब केव्ह....... त्यात हिरवगार सुंदर स्वच्छ थंडगार पाणी.....वरून पडणारे पाणी खाली पोहोचे पर्यंत त्याचे एका सरळ रेषेतील तुषारांमध्ये झालेले रूपांतर...... हि आठवण मी कायमस्वरूपी माझ्या ह्रदयात साठवून ठेवली...... सर्वजण येथे जमा झाले.... सर्वांनी या आठवणी कॅमे-यामध्ये कैद केल्या...... येथुन आमचे पाय निघतच नव्हते.  परंतु आजून 2 धबधब्यांपर्यंत पोहोचायचे होते.  त्यासाठी सर्वांनी निघण्याचा निर्णय घेतला...... खाली येऊन आम्ही गावातुन आणलेल्या पिठल भाकर खाउन घेतली.... ट्रेकिंगच एक वैशिष्ठ आहे की,  इथे खाण्यासाठी काहीही असले तरी चालत.................ना कोणती आवड-निवड ना.............चवीची कटकट..... ना कोणाचे खाण्याचे नखरे.......


    
  भाकरी खाऊन परतीचा मार्ग निवडला..... या पुर्ण प्रवासात विशिष्ठ असा मार्ग नाहीच.....तो आपण शोधायचा.....आपण ठरवायच कस जायच.....कोठून चढायच...... जर का निर्णय चुकला...... तर परत यायच.....नी परत निघायच.....
      परंतु आमचा वाट काढण्याचा आत्तापर्यंतचा निर्णय चुकला नव्हता...... अरविंदचा अनुभव कामी येत होता...
      आता सहाव्या धबधब्याकडे वाटचाल सुरू केली.......जसजस आम्ही उंच उंच जात होतो तस तसा जाण्याचा मार्ग अत्यंत बिकट आणी खुप खडतर होत होता.  एकाबाजूला खोल दरी आणी एका बाजूरा उंच उंच डोंगर.....स्वत:चा तोल(वजन) डोंगराचे दिशेने टाकुन ....अक्षरश: हात टेकत टेकत आम्ही एक 100 ते 200 फुटांचा आडवा पॅच मार्गक्रम केला...... जेव्हा आम्ही अशा एका ठिकाणी आलो की आता वर चढाई कशी करावी हा प्रश्न निर्माण झाला..... अरविंदने आम्हा सगळ्यांना एकाठिकाणी थांबवुन तो रोप व
चढाईची इतर साधन घेऊन वर जाऊ लागला ........अरविंद जस जसा आमच्या पासून वर जात होता........तस तसा त्याचा आकार काडेपेटीच्या आकाराचा दिसत होता........आणी नंतर तो दिसेनासाच झाला..... मग काय आमच्या पोटात गोळा..... आमच्या पुढे असविंदला बॅकप म्हणून धिरज होता...........मग आम्ही धिरजला सांगत होतो की अरविंदला खाली बोलव जर जाणे शक्य नसल्यास आपण परत जाऊ आणी नंतर चढाई करू कारण येथून 6 आणी 7 नंबरचा धबधबा जवळ जवळ 1000 ते 2000 फुटांवर होते...... आणी दुपारचे 3.30 वाजले होते.........आता चढाई करायची झाल्यास तिथ पर्यंत पोहोचणे जवळ जवळ अशक्य होते.........आणी समजा जरी पोहोचलो तरी आम्हाला परतीचा मार्ग म्हणजे वरून डोंगर माथ्याजवळुन 10 ते 15 कि.मि. चालत जाऊन गावात उतरावे लागणार होते..... त्यात भर म्हणजे कोणीही रात्रीच्या वेळची प्रकाशाची व्यवस्था म्हणुन बॅटरी आणलेली नव्हती...........त्या गावातच बॅगेत राहील्या होत्या...... आणी मोबाईलच्या बॅटरी पण डाऊन झाल्या होत्या...... पण अरविंद पुढे गेला होता तो काही केल्या परत येत नव्हता...... बर त्यात भर म्हणुन मी, जुई तिलोत्तमा आणी दळवी ज्या ठिकाणी उभे होतो त्या ठिकाणी आमचे पाय दुखायला लागुन सुध्दा बसु शकत नव्हतो..... कारण त्या वाटेवर आम्ही एका पुढे एक अशे एका रांगेत उभे राहू एवढीच जागा....... चुकुन पायाची हालचाल केली आणी एखादा पाय मागे पुढे नबघता टाकला की 500 फुट खाली....... बर दुस-या बाजुला उंचावरून पडणारा मगाचचा पाच नंबरचा धबधबा आम्हाला जवळुन उंचावरून दिसत होता.....त्याच्या कडे पाहील्यावर एक दोन मिनिटाने चक्कर येण्याची पाळी..... मला न राहून त्याच्या व्हिडिओ करण्याचा मोह आवरता आला नाही...... मी व्हिडिओ करायला घेतला ..........लक्ष कॅमे-यावर केंद्रीत असल्याने उंची मुळे 1 / 2 मिनिटातच माझ्या लक्षात आल की आपण असच शुटिंग करत राहिलो तर कदाचीत आपणाला चक्कर येउ शकते...... मी उभा होतो त्याच्या जवळच 2 फुटावर एक मजबुत जाडीचे झाड होते......... परंतु त्याच्या जवळ पोहोचणे म्हणजे दिव्याच .....ते दिव्य पार करून मी झाडाचा आधार घेउन पुन्हा शुटींग चालु केल....
     
अरविंदचा पत्ता नव्हता...... कॉलिंग सुरू ....ओए.....एओ..... अर्धा पाउण तासाच्या अथक प्रयत्ना नंतर तो पुन्हा खाली आला......त्याच्या सांगण्या नुसार चढाई करायची झाल्यास पुर्ण क्लायंबिंग करतच जावे लागेल......आता ती शक्ती कोणातही उरली नव्हती...... कारण पहिल्या धबधब्या पसुन आम्ही जवळ जवळ 2500 फुट वर चढून आलो होतो..... त्यामुळे एकाच दिवसात चढाई अशक्य होती.....त्यातच मी त्या 6 आणी 7 नंबर धबधब्याचे शुटींग केले आणी पाहीले असता दोन्ही ठिकाणी उभे रहाण्याची सध्यातरी जागा दिसत नव्हती त्यामुळे चर्चे अंती पुढील वेळी डोंगर माथ्यावरून रॅपलिंग करत त्या ठिकाणी उतरण्याचा निर्णय झाला.... एव्हाना 4 वाजले होते... वेळीच खाली न गेल्यास गावातुन श्री.दळवी यांचे नातेवाईक शोधायला येण्याची सुध्दा शक्यता होती..... त्यामुळे आम्ही परत निघण्याचा निर्णय घेतला.....
      परंतु आम्ही अशा ठिकाणी उभे होतो की,  परतीचा मार्ग म्हणजे दिव्यच........ परत डोंगरावरून अॅंकर करून दोरीच्य़ा सहाय्याने आम्ही सर्व खाली उतरलो ....... परतीचा मार्ग चढाईच्या मार्गापेक्षा जास्त आनंद देत होता......
      सर्वांना तहान लागल्याने सर्व पहिल्या धबधब्याच्या दिशेने सुसाट पळत सुटले.......वर नमुद केल्या प्रमाणे खाली श्री.दळवींचे नातेवाईक आलेच होते.....धिरज...जुई.......तिलोत्तमा दगडांवर झोपुन त्या थंडगार पाण्यात आपले तोंड बुडवुन पाणी पित होते..... त्यांचा तो थकवा त्या थंडगार पाण्यात डोके बुडवल्याने दुर झाला होता......मी त्यांचे हे क्षण माझ्या कॅमे-यामध्ये कैद केले... मी सुध्दा मनसोक्त पाणी पिउन तृप्त झालो होतो....
परतीच्या जंगल वाटेत एका ठिकाणी मधाचे पोळे दिलसे ..... मग काय विचारता......अरविंदने ते काढले..... त्या मधाची चव.....अप्रतिम..... सर्व त्या मधाच्या पोळ्यावर तुटून पडले.....
            गावामध्ये परत आल्यावर संध्याकाळी आम्ही नदीवर जाऊन आंघोळ केली....संध्याकाळी 7 वा दुपारचे जेवण......आम्ही श्री. राजेंद्र दळवी यांचे आईचे आजोळ लांजा तालुक्यातील हर्दखळे या गावात असणा-या सह्याद्रिच्या कुशीत एक नव्हे तर अनेक अशा 7 धबधब्यांची श्रुंखलाच शोधुन काढली.  स्थानीक लोकांना सुध्दा याचे खुप आश्चर्य वाटले कारण........ नवीन पिढीतल्या तरूणांना - लोकांना इतके धबधबे आहेत याची कल्पनाच नव्हती.   आणी माहिती नसणे हे सुध्दा सहाजीकच आहे म्हणा कारण पहिला धबधबा सोडल्यास वरचे इतर 6, जोपर्यंत आपण वर चढून जात नाही तो पर्यंत दिसतच नाहीत...... किंबहून यातील 2 - 3 तर त्याच्या पुढ्यात जाउन सुध्दा दिसत नाहीत. यातील 3 ते 4 धबधब्यांची उंची चक्क अंदाजे 100, 120 ते 150 फुट इतकी उंच आहे.... वाटल ना आश्चर्य..... यातील दोन - तिन धबधबे तुम्हाला, तुम्ही त्या धबधब्यांच्या समोरील डोंगरावर गेलात किंवा कशेही आणी कुठुनही पहाण्याचा प्रयत्न केलात तरी दिसणारच नाहीत.... त्यासाठी एकच मार्ग त्यांच्या पायथ्याशी जाणे..... आणी त्याच्या पायथ्याशी जाणे हे फक्त कसलेले गिर्यारोहकच करू शकतात..... परंतु आज आम्हाला हे जिद्दीमुळे शक्य झाले. फक्त गावातील काही वयस्कर ठरावीक व्यक्तींनाच याची कल्पना होती. ती सुध्दा इते धबधबे असतील असे नाही. या सर्व ठिकाणी जाणे अत्यंत म्हणजे अत्यंत अवघड..... या रेकीच्या मोहिमेच मी अस वर्णन करेन की, या आजच्या रेकीच्या ठिकाणापेक्षा आमच्या साठी दुसरे आणखी अवघड ठिकाण कोणतेच नाही आणी भविष्यात ही नसेल.... अतीशदुर्गम पहाड......65 ते 80 अंश कोनात फक्त निसरड्या डोंगरावुन दोराच्या सहाय्याने,झाडांच्या सहाय्याने फक्त त्या कोसळणा-या पाण्याच्या वेडापाई सर्वांनी चढणे आणी खाली उतरणे ते सुध्दा 100 ते 150 फुट .......आहा तो क्षण सतत माझ्या डोळ्यासमोर आयुष्यभर येत राहील...... एका पाठोपाठ एक उतरताना वरून पडणा-या दगडांच्या वर्षावाचा अनुभव घेत ..........तो पध्दतशीर चुकवत.... धुळाचे लोट..... आणी यात एकमेकांच्या साथीने उतरणे ......... कीती वर्णन करू मी....... परंतु हे सर्व करताना प्रत्येकाच्या सुरक्षीत प्रवासाची जिद्दी माउंटनिअर्सनी घेतलेली काळजी वाखाण्याजोगी आहे. ..... इथे प्रत्येकाच्या इच्छाशक्तीचा..........मनोधैर्याचा....ताकतीचा.....कस लागला.
      या गावात अशे 7 धबधबे असतील याची आम्हाला देखील पुसटशी कल्पना नव्हती मात्र श्री. दळविंनी याची थोडीपार कल्पना होती पण खात्री नव्हती...

      असो जेवणा नंतर आम्ही राहिलेल्या 2 धबधब्यांवर थोड्याच दिवसात पुन्हा रॅपलिंग करत उतरण्याचा निर्धार करून परतीच्या प्रवासाची वाट धरली......



1 comment:

Rahul blogger said...

Well narrated Umesh. Keep it up